

चेंदवण येथे आज कृषी मेळावा
कुडाळ : चेंदवण शिवसेना आयोजित कृषी मेळावा चेंदवण २०२६ चे आयोजन १६ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत चेंदवण हायस्कुल, हॉल येथे करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना पदाधिकारींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात ‘शेतीत नवे तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी एक पाऊल पुढे’ या अनुषंगाने आधुनिक शेती, तंत्रज्ञान, शेती अवजारे, आधुनिक शेती माहिती, नवीन बी-बियाणे, खत व्यवस्थापन सिंचन पध्दती यांचे मार्गदर्शन, पीएम किसान योजनेसंदर्भातील शंकांचे निराकरण, मागेल त्याला काजू कलमे योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे, पशुधन वाढीसाठी केसीसी कॅम्पचे आयोजन, मोफत रेनकोट वाटप आदींचे आयोजन केले आहे. यावेळी खरीप हंगामावर आधारित भात बीज प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. महाविस्तार ॲपविषयी मार्गदर्शन, मोफत हळद बियाणे वाटपाची नोंदणी होईल. अधिक माहितीसाठी रश्मी नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.