खाडीकिनारच्या दारूविक्रीला आळा घाला मच्छीमार संस्था ः देवगडप्रश्‍नी पोलिसांची घेतली भेट

खाडीकिनारच्या दारूविक्रीला आळा घाला

मच्छीमार संस्था ः देवगडप्रश्‍नी पोलिसांची घेतली भेट
Published on

59591

खाडीकिनारच्या दारूविक्रीला आळा घाला

मच्छीमार संस्था ः देवगडप्रश्‍नी पोलिसांची घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः येथील खाडीकिनारच्या परिसरात होत असलेल्या गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अशा अवैध दारू विक्रीला तातडीने आळा घालण्याची मागणी स्थानिक मच्छीमारी संस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे येथील पोलीसांकडे करण्यात आली आहे. मच्छीमार संस्थाच्यावतीने येथील पोलिसांची भेट घेण्यात आली.
निवेदन देताना ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे, विनायक प्रभू, द्विजकांत कोयंडे, उमेश कदम, कृष्णा परब आदी उपस्थित होते. निवेदन महिला पोलिस हवालदार पी. आर. कविटकर यांनी स्विकारले. निवेदनात म्हटले आहे, गोवा बनावटीच्या दारुची येथील बंदर जेटी परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अधिकृत परवाना दारूपेक्षा स्वस्त असल्याने ही दारु मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अशी दारु पिल्याने अनेक आजार होतात. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही दारु बेकायदेशीररित्या विकली जाते. त्यामुळे अशा गोवा बनावटीच्या दारु विक्रीवर छापे टाकून बंदी घालण्यात यावी. गोवा बनावट दारुवर बंदी घालण्यात यावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com