सती विद्यालयाची सात बक्षिसांची कमाई

सती विद्यालयाची सात बक्षिसांची कमाई
Published on: 

-ratchl३३.jpg-
26O67973
चिपळूण ः गांधी जयंतीनिमित्ताने झालेल्या स्पर्धेत विजेते ठरलेले सती विद्यालयाचे विद्यार्थी.
----
न्यू इंग्लिश स्कूलची यशाची पंचमी
गांधी प्रतिष्ठान ; निबंध-वक्तृत्वमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत खेर्डी-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग पाचव्या वर्षी यशाची परंपरा कायम राखली. जिल्ह्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सती विद्यालयाने सर्वाधिक बक्षिसे मिळवली.
गांधारेश्वर येथील महात्मा गांधी रक्षाकलश समाधी स्मारकासमोर झालेल्या कार्यक्रमात विजेत्यांना आमदार शेखर निकम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात वेदांत महाडिक, माध्यमिक गटात इच्छा कदम यांनी प्रथम, तर कनिष्ठ महाविद्यालय गटात भूमी कोलगे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. सोनाली मोहिते हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रचिती कुंभार आणि कनिष्ठ महाविद्यालय गटात वेदिका पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. वरिष्ठ महाविद्यालय व खुल्या गटात साहाय्यक शिक्षिका अंजली दाभोळकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या यशासाठी मुख्याध्यापक संजय वरेकर यांच्या नियोजनासह अंजली दाभोळकर, योगेश नाचणकर, कविता राजे महाडीक, निर्मळ, कस्तुरी चव्हाण, मोरे, एस. वाय. हातणकर आणि ग्रंथपाल जयंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला माजी आमदार रमेश कदम, कलामहर्षी प्रकाश राजेशिर्के यांच्यासह गांधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com