

rat4p12.jpg-
67784
चिपळूण : डेरवण हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दूरवस्था.
-----
डेरवणच्या रस्त्याची दुरवस्था कायम
वाहनचालकांची कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः सावर्डे परिसरातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते.
डेरवण येथील वालावलकर रुग्णालय चिपळूण शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असून, रुग्णालयात उपचारासाठी परिसरातील तसेच अन्य भागांतील नागरिक येतात. त्यामुळे रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठीही या रस्त्याची स्थिती महत्त्वाची ठरते. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याची अधिकच झीज झाली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांची कसरत होत असून, दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर यापूर्वी वाहनांच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रुग्णालयाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने खड्डे बुजविण्यापुरती तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी डागडुजी करावी. रुग्ण, रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.