‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाइन

‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाइन
Published on: 

‘आवडेल तेथे प्रवास’ पास घरबसल्या

ऑनलाइन पासला क्यूआर कोडची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) प्रवाशांना अद्ययावत सुविधांसह विविध सवलती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महामंडळाने ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजनाही आता ऑनलाइन केली आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या चार किंवा सात दिवसांचा पास काढता येणार असून, पास काढण्यासाठी आगारात जाण्याची किंवा तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचे पास दिले जातात. या पासच्या माध्यमातून राज्यात इच्छित ठिकाणी प्रवास करता येतो. यापूर्वी हे पास आगारातून हस्तलिखित पद्धतीने वितरित केले जात होते. त्यामुळे पास काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहावे लागत होते. आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार आहे. प्रवाशांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून ऑनलाइन पास काढता येणार आहे. या प्रणालीद्वारे चार आणि सात दिवसांचे ‘आवडेल तिथे प्रवास’ पास उपलब्ध आहेत. ऑनलाइन काढलेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमधील पीडीएफ स्वरूपात प्रवासासाठी वैध मानला जाणार आहे.
प्रवासादरम्यान वाहक ईटीआय मशिनद्वारे पासवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची पडताळणी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाइन पाससोबत वैध ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे.
---
इथे संपर्क साधा
आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा डिजिलॉकरमधील ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. प्रवासादरम्यान क्यूआर कोड स्कॅन न होणे किंवा अन्य तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी ०८०६५९०३२७२ किंवा ०८०६५९०३२७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com