बसsss झालं, मी थांबतो! रोहित शर्माला नागपूर सामन्यानंतर गौतम गंभीरने झापलं? Video Viral, नेटिझन्सचा अजब तर्क

Gautam Gambhir & Rohit Sharma Video: भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यांत रोहित शर्माला २ धावा करून तंबूत परतला आणि नेटिझन्सचा पारा चढला...
rohit Sharma Gautam Gambhir
rohit Sharma Gautam Gambhiresakal
Updated on

India vs England 1st ODI: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत पहिल्याच सामन्यात कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. ७ चेंडूंचा सामना करून रोहित अवघ्या दोन धावांवर माघारी परतला. पण, शुभमन गिल, श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांनी उपयुक्तता सिद्ध करताना भारताला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली आहे. नागपूर येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ २४८ धावांत तंबूत परतला. पदार्पणवीर हर्षित राणा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर गिल, अय्यर व पटेल यांच्या अर्धशतकांनी भारताला ६८ चेंडू व ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com