Swadesh Ghanekar
स्वदेश घाणेकर.
क्रीडा पत्रकारितेत १३ वर्षांचा अनुभव.. सह्याद्री वाहिनी, पुढारी, लोकमत व लोकसत्ता या वृत्तपत्रांमध्ये क्रीडा विभागात ७ वर्ष काम केल्यानंतर २०१८ मध्ये लोकमत डिजिटलमध्ये कामाला सुरुवात केली. सध्या मी सकाळ डिजिटलमध्ये सीनियर मल्टीमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. येथे सकाळ प्रीमियम स्पोर्ट्स आणि सकाळ क्रीडा विभागाची जबाबदारी माझ्यावर आहे.
इंडियन प्रीमिअर लीग, सचिन तेंडुलकरची निवृत्तीची कसोटी, भारताच्या अनेक क्रिकेट सामन्यांचे थेट मैदानावरून रिपोर्टिंग, फिफा १७ वर्षांखालील वर्ल्ड कप ( दिल्ली), जागतिक बॉक्सिंग स्पर्धा ( गुवाहाटी), प्रो कबड्डी लीग, इंडियन सुपर लीग, आय लीग, टेनिस, बॅडमिंटन, बुद्धीबळ अशा अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे फिल्ड रिपोर्टींगही केले आहे. याशिवाय अनेक मान्यवर जसे की विश्वनाथन आनंद, बजरंग पुनिया, मेरी कोम, सुनील छेत्री यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.