

INDIA BEAT NEW ZEALAND BY 4 WICKETS
esakal
INDIA BEAT NEW ZEALAND BY 4 WICKETS: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना अक्षरश अंगावर काटा आणणारा ठरला. शेवटपर्यंत या सामन्यात एवढा थरार होता की, कोणता संघ बाजी मारणार, हे सांगणं कठीण झालं होतं. मात्र, भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, पॉवरप्लेनंतर एकापाठोपाठ एक विकेट्स पडू लागल्या आणि भारत अडचणीत सापडला. तरीही शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात तिलक वर्माने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.