KL Rahul dismissed for zero against New Zealand A
esakal
India A bowled out for 113 runs against New Zealand A: न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात भारताचे स्टार फलंदाज गार झाले. भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यातल्या सामन्यात भारताचा पहिला डाव ११३ धावांवर गडगडला. लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर हे आंतरराष्ट्रीय खेळाडू ढेपाळले. पण, नागपूरचा २६ वर्षीय यश राठोड किवी गोलंदाजांसमोर उभा राहिला आणि नाबाद ४४ धावा करून संघाची लाज वाचवली.