IND A vs NZ A मालिका शनिवारपासून, दुसरी ट्वेंटी-२० मॅचही उद्याच... मग कसोटी कोणत्या चॅनेलवर पाहाल? किती वाजता मॅच सुरू होणार?

India A vs New Zealand A 1st unofficial Test live streaming: भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तीन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेला शनिवार, २४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडमधील लिंकन येथील बर्ट सटक्लिफ ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.
India A vs New Zealand A 1st unofficial Test live streaming

India A vs New Zealand A 1st unofficial Test live streaming

esakal

Updated on: 

Where to watch India A vs New Zealand A Test live in India: भारताचे दोन फॉरमॅटमधील संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहेत... श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील ट्वेंटी-२० संघाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तेच शनिवारी दुसरा सामना होणार आहे आणि त्याचवेळी ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी मैदानावर उतरणार आहे. भारताला दोन कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यावर खेळायची आहे आणि त्याच्या तयारीसाठी भारत अ संघात काही सिनीयर खेळाडू न्यूझीलंड अ संघाविरुद्ध कसोटी मालिकेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com