Kieron Pollard creates history by becoming the second cricketer to score 15,000 runs in T20 cricket
esakal
Kieron Pollard becomes first non-opener to score 15000 T20 runs: मुंबई इंडियन्सचा कोच किरॉन पोलार्ड याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. स्टार अष्टपैलू खेळाडू पोलार्ड ट्वेंटी-२० मध्ये १५,००० हून अधिक धावा करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूचा मान पटकावला. MI EMIRATES च्या कर्णधाराने २१ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर डेझर्ट वायपर्सविरुद्धच्या ILR20 सामन्यादरम्यान हा टप्पा गाठला. ३८ वर्षीय खेळाडू सलामीवीर नसताना १५,००० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ६७२ डावांमध्ये १५,०१४ धावा करताना ७१ अर्धशतके आणि दोन शतकं झळकावली आहेत.