Pakistan Asian Games 2026 squad without Babar Azam
esakal
No Babar Azam in Pakistan T20 team for Asian Games: भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आशियाई स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी उतरणार आहे. भारताने या स्पर्धेसाठी तगडा संघ जाहीर केलेला पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) घाबरल्याचे दिसतेय आणि त्यांनी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. त्यात बाबर आझम, शाहिन शाह आफ्रिदी, सलमान अली आघा, शाबाद खान, हॅरिस रौफ आदी सीनियर खेळाडूंना डावलले आहे. भारताविरुद्ध निभाव लागणार नाही, हे माहित असलेल्या पाकिस्तानने त्यामुळेच युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.