

Virat Kohli likely to play the 2nd ODI Vs England : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या विजयानंतरही टीम इंडियाच्या तयारीच्या दृष्टीने काही प्रश्न उद्भवले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीचा गुडघा दुखावला गेला आणि त्याला नागपूर सामन्यात खेळता आले नाही. त्यात रोहित शर्माचा फॉर्म, ही खूप मोठी चिंतेची बाब बनली आहे. विराटच्या गैरहजेरीत संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरने दमदार खेळ केला आणि आता दुसऱ्या वन डे सामन्यात त्याचे स्थान पक्के मानले जात आहे. अशात विराट दुसऱ्या वन डे सामन्यात खेळणार की नाही, हा प्रश्न आहेच. सामन्यानंतर उप कर्णधार शुभमन गिल याने विराटच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.