VVS Laxman निवड समितीच्या बैठकीत कसा? गौतम गंभीरची जागा घेण्याची तयारी की आणखी काही? BCCI ने दिले उत्तर

VVS Laxman selection meeting Guwahati BCCI reason: न्यूझीलंड दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित नव्हता, परंतु व्ही व्ही एस लक्ष्मणच्या उपस्थितीनंतर बरेच प्रश्न उभे राहिले आहेत.
VVS Laxman attend Team India selection meeting

Why did VVS Laxman attend Team India selection meeting

esakal

Updated on: 

BCCI explains VVS Laxman presence in selection meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समिती अध्यक्षपदासाठी अर्ज मागवण्यात आल्याचे ट्विट केले अन् त्यानंतर काही वेळातच न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला गेला. अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar) कार्यकाळ संपल्याचे, यावरून स्पष्ट झाले आणि प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रग्यान ओझाने कालच्या बैठकीत कार्यभार सांभाळला. पण, या बैठकीत माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण याच्या उपस्थितीने अनेक प्रश्न उपस्थित राहिले. गौतम गंभीरच्या जागी भविष्यात लक्ष्मणची निवड केली जाईल, अशी चर्चा असताना बैठकीतील माजी फलंदाजाची उपस्थिती लक्षवेधी ठरली. बीसीसीआयनेही या प्रकरणावर मौन सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com