रवींद्र जडेजा निवड समिती प्रमुखपदासाठी अर्ज करणार? अजित आगरकरनंतर रिक्त झालंय पद, BCCI ची जाहिरात अन् जड्डूची पोस्ट...

Ravindra Jadeja reaction to BCCI selector vacancy: अजित आगरकरने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपवल्यानंतर BCCIने रिक्त पदासाठी अर्ज मागवले आहेत.
Ravindra Jadeja asks BCCI about chief selector application process

Ravindra Jadeja asks BCCI about chief selector application process

esakal

Updated on: 

What’s the procedure Ravindra Jadeja BCCI post? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदासाठी जाहिरात काढली. अजित आगरकरचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपला आणि BCCI नव्या निवड समिती अध्यक्षपदाच्या शोधात आहे. आगरकरनंतर ही जबाबदारी सध्यातरी समिती सदस्य प्रग्यान ओझाने सांभाळली आहे, परंतु हे पद नेमकं कुणाकडे जाईल हे कोण कोण अर्ज करतं, यावर अवलंबून आहे. अशात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा, हा या पदासाठी अर्ज करतोय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com