Shikhar Mohan called up to India A squad
esakal
India A squad changes & New Zealand A name 19-man squad : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरूवात होत आहे. या मालिकेपूर्वी भारताच्या संघात बदल करण्यात आला असून न्यूझीलंडनेही तीन वेगवेगळे संघ जाहीर केले आहे. भारताच्या संघात झारखंडच्या २१ वर्षीय शिखर मोहन ( Shikhar Mohan) याचा समावेश करण्यात आला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारतीय संघासोबत दिसेल.