

French Open 2026
esakal
पॅरिस : फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये बुधवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. २५व्या मानांकित रशियाच्या डायना श्नायडर हिने अव्वल मानांकित व चार वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या अरीना सबलेंका हिला पराभूत करीत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. तसेच पोलंडची २४ वर्षीय माजा चॉलिंस्का हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत २२व्या मानांकित ॲना कलिन्सकाया हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करताना पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली.