IPL Record : विकेटमागे धोनीला तोड नाही!

आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे सर्वाधिक कॅचेस पकडण्याचा विक्रम महेंद्रसिह धोनीच्या नावे झालाय.
MS Dhoni
MS Dhoni

IPL Record : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) अबुधाबीच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पराभूत केले. धावांचा पाठलाग करताना धोनीला फलंदाजीत नावाला साजेसा खेळ करता आला नाही. चार चेंडूचा सामना करुन तो वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर अवघी एक धाव करुन परतला. फलंदाजीला येण्यापूर्वी धोनीने यष्टीमागे खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे सर्वाधिक कॅचेस पकडण्याचा विक्रम महेंद्रसिह धोनीच्या नावे झालाय.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने दिनेश कार्तिकला ओव्हरटेक करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. 40 वर्षीय महेंद्रसिंह धोनीपूर्वी 36 वर्षीय दिनेश कार्तिकच्या नावे आयपीएलमध्ये 115 कॅचेसची नोंद होती. धोनीने शार्दुल ठाकूरच्या षटकात व्यंकटेश अय्यरचा विकेटमागे झेल घेतला. तर हेजलवूडच्या गोलंदाजीवर त्याने दिनेश कार्तिकच्या रुपात दुसरा झेल घेतला. आयपीएलमध्ये विकेटमागे सर्वाधिक दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी कॅच आणि स्टम्पिंग दोन्हीत अव्वल आहे.

MS Dhoni
Video: खतरनाक स्पिन! धोनीचा वरूण चक्रवर्तीने उडवला त्रिफळा

विकेटमागे सर्वाधिक कॅच आणि स्टम्पिग करणारे खेळाडू

महेंद्र सिंह धोनी 116 कॅच + 39 स्टम्पिंग = 155

दिनेश कार्तिक 115 कॅच + 31 स्टम्पिंग = 146

रॉबिन उथप्पा 58 कॅच + 32 स्टम्पिंग = 90

पार्थिव पटेल 65 कॅच + 16 स्टम्पिंग = 81

वृद्धिमान साहा 59 कॅच + 20 स्टम्पिंग = 79

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com