Schoolympics 2023 Season 6 : तीन खेळाडूंची हॅट्ट्रिक! स्कूलिंपिकच्या फुटबॉल स्पर्धेत 'या' स्कूलचा दणदणीत विजय

Schoolympics 2023 Season 6
Schoolympics 2023 Season 6
Updated on

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी तीन खेळाडूंनी हॅट्ट्रिक नोंदविली. मुलींच्या विभागात आर्या चौधरी आणि सायली कासट, तर मुलांच्या विभागात वेदांत चोप्रा यांनी हा पराक्रम केला.

मुलींचे सामने धनकवडीतील भरती विद्यापीठाच्या मैदानावर सुरु आहेत. भूगावच्या श्री श्री रविशंकर विद्यामंदिरच्या आर्या चौधरीने शिरूरच्या व्हिजन इंटरनॅशनलविरुद्ध हॅट्ट्रिकसह पाच गोलांचा धडाका लावला. त्यामुळे तिच्या संघाने ५-० असा दमदार विजय संपादन केला. आर्याची कामगिरी दिवसात सर्वोत्तम ठरली.

डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूलच्या सायली कासटने चार गोल करताना हॅट्ट्रिकचा पराक्रम केला. त्यामुळे तिच्या संघाने शिरूरच्या ब्लिस इंटरनॅशनल स्कूलवर ७-० अशी मात केली. सांघिक निकषावर हा दिवसातील सर्वांत मोठा विजय ठरला.

Schoolympics 2023 Season 6
Schoolympics 2023 : स्कूलिंपिकच्या तिरंदाजीत अटीतटीच्या लढतीत जान्हवी पवारची समा पाटीलवर मात

पाषाणच्या एनसीएल मैदानावर मुलांच्या विभागात मुंढव्यातील ऑर्बिसच्या वेदांत चोप्राने हॅट्ट्रिक केली. त्यामुळे त्याच्या संघाने सॅमसन मेमोरियल रिपब्लिक हायस्कूल, देहूरोडचा ६-० असा पराभव केला.

आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे संघाने सिम्बायोसिस स्कूल, प्रभात रोड संघावर टायब्रेकमध्ये ५-४ अशी मात केली. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी झाली. यात सिंबायोसिसच्या अर्जुन कबादीने नवव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. तनिष घाटीकर याने १३व्या मिनिटाला आर्यन्स वर्ल्डला बरोबरी साधून दिली. ही बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट घेण्यात आला. त्यात श्लोक भणगे, सोहम दळवी, वैभव पवार, भावेश धेडे या चौघांनी गोल केले. सिम्बायोसिसकडून जतिन चौधरी, अवधूत बहिरट आणि अर्जुन कबादी या तिघांनाच गोल करता आले. प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड व रसिकलाल एम. धारिवाल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड या दोन्ही संघांत निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट घेण्यात आला. त्यात प्रतिभा स्कूलच्या समर्थ आदिवरेकर, वरद भैराळे, सक्षम मिश्रा, मानव सुब्रह्मण्यम या चौघांनी गोल केले. धारिवाल स्कुलकडून आरव जगताप, अथर्व डुब्बेवार आणि रुद्र मोकादम या तिघांनाच गोल करता आले.

Schoolympics 2023 Season 6
Ind vs Aus 3rd T20 Playing 11 : रोहितचा लाडका संघाबाहेर, धोनीच्या हुकमी एक्क्याची प्लेइंग-11 मध्ये एन्ट्री?

सविस्तर निकाल :

मुली : फॉर्च्युन हायस्कूल, हांडेवाडी : २ (सृजन शेवाळे १०वा मिनीट, हितांशी गुप्ता २२) विवि एंजल हायस्कूल, उरुळी कांचन : ०.

ब्लू रिज पब्लिक : १ (आश्मी वाठेर १०) विवि (आर्मी पब्लिक, घोरपडी) : ०.

श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव : ५ (आर्या चौधरी ३, ७, १२, २१, २५) विव व्हीजन इंटरनॅशनल, शिरूर : ०.

डॉ. कलमाडी, एरंडवणे : ७ (सायली कासट १४, १७, १९, २३, अनुष्का रेगे १३, १९, गुंजन भंडारी ११) विवि ब्लिस इंटरनॅशनल, हिंजवडी : ०.

मुले : युरेका इंटरनॅशनल, धायरी : ३ (शाहरुख खान ३, ३५, हृषिकेश उप्पालांची २४) विवि वॉलनट, वाकड : १ (राघव गाडगे ११).

एसएनबीपी, रहाटणी : २ (अधिराज सिंग ११, २२) विवि विद्यावर्धिनी इंग्लिश, शिवाजीनगर : १ (प्रतीक कांबळे ६).

ऑर्बिस, मुंढवा : ६ (वेदांत चोप्रा ११, १३, १७, तनिष्क साहू ४, कार्तिकेय गौर १९, पुष्कर खोले २३) विवि सॅमसन मेमोरियल रिपब्लिक, देहू रोड : ०.

रायन, बावधन : १ (आर्पम जावरे २९) विवि होली एंजल्स कॉन्व्हेंट :०.

ब्लू रिज पब्लिक, पुणे : ३ (विराज पाटील १०, अर्जुन दातीर २८, आदित्य देशमुख ३०) विवि लोकसेवा, पाषाण : ०.

हाय व्हीजन इंटरनॅशनल, सोमाटणे : ५ (अभिमान बिरजे १०,१५,२९, अंश पवार २१, झुल्फिकार देवतळे २८) विवि अभिनव इंग्लिश, कोलवडी : ०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com