Physical Relations: लग्नाआधी पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Physical Relations

Physical Relations: लग्नाआधी पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?

Relationship News: शारीरिक संबंधांबद्दल बोलताना आजही अनेक लोक एक पाऊल मागे असतात. त्यामुळे यावर उघडपणे चर्चाही होत नाही. मात्र हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग ठरतो. अॅडवांस टेक्नॉलॉजी, लिवींग रिलेशनशिप आणि बऱ्याच आधुनिक गोष्टींमुळे आजची पिढी फार पुढे निघाली आहे. यात आधुनिक पिढीतील बरेच तरूण लग्नाआधीच शारीरिक संबंधात येतात. मात्र लग्नाआधी शारीरिक संबंध कितपत योग्य ते जाणून घेऊया.

अनेक जोडप्यांच्या मते, सेक्सपेक्षा समजुतदारी महत्वाची असते तर अनेकांना पार्टनरसोबत सेक्स करण्यात आनंदही मिळतो. तुमची इंटीमसी तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये फिजिकल कम्पॅटबिलीटी आहे की नाही हे समजण्यास तुम्हाला मदत करते. अनेक जोडप्यांची नाती शारीरिक संबंधांमध्ये खुश नसल्याने तुटतात. त्यामुळे शारीरिक संबंध आयुष्यातील महत्वाचा मुद्दा ठरतो.

लग्नाआधी सेक्सचे फायदे

एकमेकांचा प्लेजर पॉइंट जाणून घेणे

सेक्स तुम्हाला एकमेकांचा प्लेजर पॉइंट समजण्यास मदत करेल. ज्यामुळे तुम्ही लग्नानंतर त्याच्यासोबत कंफर्टेबल असाल किंवा नाही ते कळण्यास मदत होईल. उदा, जर तुमच्या पार्टनरला वाइल्ड सेक्स आवडत असेल पण तुम्ही त्यात कंफर्टेबल नसाल तर तुम्हाला आधीच याबाबत क्लियरनेस असेल. त्यामुळे तुम्हाला अशा पार्टनरसोबत पुढे आयुष्यभर संबंध ठेवायचे की नाही हे समजण्यास मदत होईल.

आवड नावड जाणून घेणे

तुम्ही गंभीर रिलेशनशिपमध्ये येण्याआधीच तुम्हाला तुमच्या आवडी आणि नको असलेल्या गोष्टी क्लियर असेल. इनसिक्योरीटी, हायजीन यांसारख्या समस्या सोडवण्यासही तुम्हाला मदत होईल. ज्यामुळे लग्नानंतर जोडपं बिनधास्त त्यांची इंटिमसी एन्जॉय करू शकतात. (Relationship Tips)

लग्नाआधी सेक्स केल्याने होणारे नुकसान

डिच करण्याची भीती

तुम्ही पार्टनरसोबत शारीरिक संबंधात आल्यानंतरही तुमचा पार्टनर तुम्हाला सोडणार नाहीच अशी शाश्वती नसल्यास लग्नाआधी सेक्स करणे तुमच्यासाठी फार मोठी रिस्क ठरू शकते. संबंध बनवण्याच्या नादात तुमचा युज केल्या जाऊ शकतो.

प्रेग्नेंसी

तुम्हाला माहिती आहे काय कंडोमसुद्धा तुम्हाला प्रेग्नेंसीमध्ये १०० टक्के प्रोटेक्शन देण्याची गॅरंटी देत नाही. तेव्हा तुमच्यातील सेक्स तुमच्या फिमेल पार्टनरला प्रेग्नेंटही बनवू शकतं. पार्टनर लग्नाआधीच प्रेग्नेंट झाल्यास तुमच्याच समस्येत वाढ होईल.

मूव ऑन करणेही कठीण

तुम्ही पार्टनरसोबत फिजीकल रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जर तुमच्या पार्टनरने डिच केलं किंवा तो तुमच्यातील सेक्स संबंधांनी समाधानी नाही तर अशा वेळी इमोशनल पार्टनरला मूव ऑन करणं कठीण जातं. तुमच्या मनात अशा वेळी पश्चातापही निर्माण होतो.

हेही वाचा: Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

डिस्क्लेमर - संबंधित माहितीबाबत सकाळ जबाबदार नसून ही माहिती काही अनुभवी लेखांतून घेण्यात आली आहे. तुमच्या अंतर्गत समस्येबाबत कुठलीही अडचण असल्यास माहिती वाचल्यानंतर संबंधित तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.