"महागडे स्किनकेअर नाही..." तर तुपासोबत खाते हा पदार्थ; आलिया भट्टने स्वतःच सांगितलं चमकदार त्वचेचं रहस्य

Alia Bhatt's Glowing Skin Secret: महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स न वापरता, तूप काही साध्या पदार्थांपासून बनणारा स्नॅक आलिया भट्टच्या चमकदार त्वचेचं रहस्य असल्याचं तिने स्वतःच सांगितलं.
Alia Bhatt Skincare Secrets

Alia Bhatt Skincare Secrets

sakal

Updated on

Health benefits of Ghee, Jaggery, Peanut and Coconut: आलिया भट्ट 33 वर्षांची असली तरी ती अनेकदा 25 वर्षांची दिसते, हे तिच्या चाहत्यांनाच नाही तर अनेकांना जाणवतं. बऱ्याच जणांचा चेहराच 'बेबी फेस' असतो, त्यामुळे ते त्यांच्या वयापेक्षा लहानच दिसतात. पण आलियाच्या बाबतीत फक्त हेच एक कारण नाहीये. तिचं स्किनकेअर रूटीन, संतुलित आहार आणि शक्य तितक्या नैसर्गिक आणि घरगुती उपायांवर असलेला विश्वासही तिच्या चमकदार त्वचेचं एक महत्त्वाचं रहस्य मानलं जातं.

नुकत्याच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 दरम्यान आलियाने तुपापासून बनणाऱ्या तिच्या आवडत्या 'स्किन स्नॅक'बद्दल खुलासा केला आहे. तूप, गूळ, शेंगदाणे आणि खोबऱ्यापासून बनणारा हा साधा स्नॅक त्वचेसाठी खरंच फायदेशीर आहे का, याबाबत तज्ज्ञांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com