'मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दबावापुढे झुकू नये' - आशिष शेलार

Ashish shelar criticized sharad pawar and ncp on nawab malik ed raid
Ashish shelar criticized sharad pawar and ncp on nawab malik ed raid esakal

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना इडीने अटक केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यातील मंत्री ज्यांची कोठडीत रवानगी केली, त्या नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, तसेच त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी भाजप (BJP) चे नेते अशिष शेलार यांनी केली आहे.

आता करून दाखवा..

शेलार म्हणाले की, देशहितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताठ मानेने उभे रहावे, त्यांनी शरद पवार यांच्या दबावापुढे झुकू नये. झुकेंगे नही हे केवळ बोलायचं नाही, आता करून दाखवायचं. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आदेश द्यावेत की, नवाब मलिक यांच्यासारख्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, सोबतच अजून किती नेत्यांचे दाऊद, त्याची बहिण हिच्याशी आर्थिक व्यवहार आहेत याची चौकशी करावी.

शेलार त्यापुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणाना आतंकवाद्यांवर कारवाईसाठी समर्थन द्यावे. तसेच देव, देश आणि धर्मासाठी तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या, असे अवाहन देखील शेलार यांनी केलं. ते पुढं म्हणाले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे हे भूमिका घेतील तर भाजप त्यांना 100 टक्के समर्थन देईल असे देखील सांगितले.

Ashish shelar criticized sharad pawar and ncp on nawab malik ed raid
LPG Price : LPG सिलिंडर आजपासून महाग, द्यावे लागणार 105 रुपये जास्त

ते पुढे म्हणाले की, काही लोक बातम्या दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सत्य सर्वांसमोर आले आहे असा आरोप देखील शेलार यांनी यावेळी केला. पहिला एफआयर ठाणे कसाब वडवली पोलिस स्टेशनला 18 सप्टेंबर 2017 झाला, नंतर इकबाल कासकर यांच्यावर आणि दाउदच्या बहिणीवर एफआयर झाला. त्यामुळे ही राजकीय अटक असा शिमगा केला तरी चालणार नाही.

दरम्यान 2019 मध्ये इकबाल मिर्चीवर एफआयआर झाला, 3 फेब्रुवारी 2022 ला एनआयएने दाऊद, छोटा चिकना, टायगर मेनन यांच्यावर तिसरा एफआयआर दाखल केला असे शेलार म्हणाले. पुढे त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत, यांना एवढी तरी बुद्धी असेल तर समाजावे की भाजप 2017 पासून या दहशतवाद्यांना उखाडत आहे, तसेच बोरू बहाद्दरांना आता ट्रेनिंग देण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

Ashish shelar criticized sharad pawar and ncp on nawab malik ed raid
तरुणाच्या हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, दुसरीकडे भावाकडून भावाची हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com