...याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

Eknath Shindes question to Chief Minister Uddhav Thackeray
Eknath Shindes question to Chief Minister Uddhav ThackerayEknath Shindes question to Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई : बंड पुकारलेल्या आमदारांनी परत यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे. यामुळे त्यांची सरकार वाचविण्याची धडपड दिसून येत आहे. त्यांच्या या आवाहनाला बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रश्न केला आहे. (Eknath Shindes question to Chief Minister Uddhav Thackeray)

बंड केलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे व बंड करणारे आमदार गुवाहाटीतूनच चर्चा करीत आहे. ते अद्याप मुंबईत परतलेले नाही. ते केव्हा येतील याची सर्वजण वाट पाहत आहेत. असे असाताना शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शाब्दिक हल्लेही केले जात आहे. यामुळे या आवाहनाचा अर्थ काय, असा प्रश्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थित केला आहे.

‘एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुक्कर, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे. त्यांचा बाप काढायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय, असे ट्विट बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Eknath Shindes question to Chief Minister Uddhav Thackeray
Sakal Survey : विखुरलेल्या शिवसैनिकांचा आकडा पक्षाची चिंता वाढवणारा

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना केले होते.

या आवाहनापूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. त्यावेळीही त्यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री मी नको असेल तर सांगा आजच राजीनामा देतो, इतकेही मुख्यमंत्री बोलले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम बंडखोर आमदारांवर झाल्याचे पाहायला मिळाले नाही. अशात दुसऱ्या आवाहनावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com