

Maharashtra Drought News Affected Talukas
esakal
Maharashtra Drought Survey : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची पडताळणी केली जाणार आहे. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांपैकी २० टक्के पिकांचे सर्वेक्षण करून वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याशिवाय आणखी १८ तालुक्यांचा अहवाल मागवण्यात आला असून, एकूण ३६ तालुक्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. ९) नागपुरात दिली.