

Dark monsoon clouds over Maharashtra with lightning and strong winds indicating heavy rainfall and thunderstorm activity as per IMD alert.
esakal
IMD Issues Thunderstorm and Heavy Rain Warning : मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून संपूर्ण राज्यभर पसरण्यास अजून काही दिवस लागणार आहेत.हवामान विभागाने (IMD) सोमवारी (८ जून) राज्यातील विविध भागांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी ४०-५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.