

‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल झाला आहे. राज्यात सध्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीची जागा आता उबदार हवामानाने घेतली आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या तापमानासोबतच दिवसा कमाल तापमानातही वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आज (२४ नोव्हेंबर) राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा