

Maharashtra weather update: October heat intensifies across the state, with Amravati recording 39°C, a yellow alert for hot and humid conditions in Konkan, and a chance of rain with lightning in parts of western Maharashtra
esakal
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) हंगाम संपल्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला असून, ऑक्टोबर हीटमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे कायम आहे. दरम्यान, आज, ९ ऑक्टोबर रोजी कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.