

Maharashtra CM Clears Air on Smart Meters and Rising Electricity Bills
Esakal
स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अचानक वाढ झाल्याची तक्रार राज्यातील हजारो ग्राहकांनी केली आहे. तसंच स्मार्ट मीटरला विरोधही केला जात आहे. मात्र स्मार्ट मीटरमुळे वीजबील वाढत नसून हिटवेव्हमुळे वाढल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणीवस बोलले. ते म्हणाले की, देशात स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यातही १ कोटी २३ लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. हे प्रमाण ५० टक्क्यांच्या वर झाले आहे. तर आतापर्यंत ३ लाख ग्राहकांनी तक्रार दिली. तक्रारीनंतर दुसरं मीटर घेऊन जाऊन तपासणी केली. त्यात फक्त २१० तक्रारीत तथ्य आढळलं. म्हणजे .००१ टक्के इतकंच तक्रारीत तथ्य होतं. Smart Meters Not Responsible for Power Bill Hike: Fadnavis