प्रेयसीसोबत लॉजवर असताना तरूणाचा मृत्यू, खिशात सापडलं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट

Nagpur Crime News
Nagpur Crime Newsesakal
Updated on
Summary

प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय.

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील सावनेर शहरातील आहे. अजय परतेकी असं या तरुणाचं नाव आहे.

त्यानं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अजयच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट आढळून आल्यानं पोलिसांनी (Police) तसा अंदाज व्यक्त केलाय. या घटनेमुळं नागपुरात खळबळ उडालीय.

स्टॅमिना वाढवणाऱ्या, शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या औषधांच्या जाहिरातींन बळी पडू नका असं डॉक्टर्स (Doctors) कायम सांगतात. मात्र, या सल्ल्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या एका तरुणाचा अवघ्या 25 व्या वर्षी मृत्यू झाला. नागपूरच्या (Nagpur) सावनेरमध्ये ही घटना समोर आलीय. प्रेयसीसोबत लॉजवर गेला असताना हा तरूण बेशुद्ध पडला. तरुणीनं घाबरून त्याच्या मित्रांना बोलावलं. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. गेल्या 3 वर्षांपासून अजयचं त्याच्या प्रेयसीसोबत प्रेम संबंध होते. येत्या 2 महिन्यात दोघंही लग्न करणार होते. प्रेयसीचं वय 21असून ती नर्स आहे. सावनेर पोलिसांनी प्रेयसीचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरूय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

High Alert in Hadapsar: Timer Bomb Found Inside Private Hospital Bathroom
Data Center
पंढरपूर चंद्रभागा नदी
Mumbai High Court
Marathi News Esakal
www.esakal.com