Sathyaraj Mother Passed Away: 'बाहुबली' फेम कटप्पाला मातृशोक! कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

'बाहुबली' फेम सत्यराज यांच्या आईचे निधन झाले आहे. कमल हसन यांनी ट्विटरवर शोक व्यक्त करतांंना ही माहिती दिली.
Sathyaraj Mother Passed Away
Sathyaraj Mother Passed AwayEsakal

Sathyaraj Mother Passed Away: तामिळ आणि तेलुगू चित्रपटातील लोकप्रिय अभिनेते सत्यराज हे त्यांच्या 'बाहुबली' मधील कट्टप्पाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहेत. सत्यराज यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. सत्यराज यांच्या आईचे 11 ऑगस्ट रोजी निधन झाले आहे.

त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी कोईम्बतूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते सत्यराज हे हैदराबादमध्ये शूटिंग करत होते मात्र आईच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी शुटिंग थांबवली.

Sathyaraj Mother Passed Away
Hemant Dhome: चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! ढोमेने शेअर केला मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांचा फोटोशूट

सत्यराज यांच्या आईचे नाव नाथम्बल होते. नाथम्बल यांना तीन मुले आहेत. अभिनेता सत्यराज व्यतिरिक्त त्यांना कल्पना आणि रूपा या दोन मुली आहेत. सत्यराज हे त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. सत्यराज यांच्या आईला त्यांना चित्रपटात पहायला आवडायचे. 'बाहुबली' चित्रपटातील कटप्पाची भूमिका देखील त्यांना खुप आवडली होती.

Sathyaraj Mother Passed Away
Aanandi Joshi Wedding: प्रिय जसराज संघर्षाने भरलेल्या या जीवनात... गुपचुप लग्न केल्यावर गायिका आनंदी जोशीची पहिली प्रतिक्रिया

सत्यराज यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर येताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत शोक व्यक्त केला आहे. त्यात कमल हासन, उदयनिधी स्टॅलिन यांनी आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com