हिंगोली जिल्ह्यात रमाई आवास योजनेच्या ४, २५९ घरकुलांना मंजुरी

रमाई आवास योजनेतंर्गत ग्रामपंचायतीने तयार केलेल्या प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्याना घरकुलांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले होते.
रमाई घरकुल योजना
रमाई घरकुल योजना
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात रमाई आवास योजनेतंर्गत सन २०२०- २१ या वर्षात ४, २५९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. त्याबाबत नुकतेच प्रशासकीय आदेश सर्व पंचायत समित्यांना प्राप्त झाले आहेत.

रमाई आवास योजनेतंर्गत ग्रामपंचायतीने तयार केलेल्या प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्याना घरकुलांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडील घरकुल मंजूरीचे अधिकार काढण्यात आल्यानंतर आयुक्त समाज कार्यालयाकडे घरकुल मंजूरीचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे सुरुवातीलाच प्रस्ताव मागविण्यात आले होते. ५, ९६० प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयाकडे पंचायत समितीमार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी शासनस्तरावरुन प्राप्त झालेल्या उदिष्टानुसार ४, २५९ घरकुलाना मंजूरी देण्यात आली आहे.

हेही वाचा - संगमनेरात पुन्हा गुंडांची मुजोरी. मागच्या महिन्यातही झाला होता पोलिसांवर हल्ला.

हिंगोली पंचायत समितीने ७७१ प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविले होते. त्यापैकी १८६ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. कळमनुरी पंचायत समितीने १, ९२३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविले होते. त्यापैकी, १, ५७७ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. वसमत पंचायत समितीने १, ५४१ घरकुलांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी १, ५४० घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीने १, ४४१ प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी ६७२

घरकुलांना मंजूरी मिळाली. सेनगाव तालुक्यातील २८४ घरकुलांचे प्रस्ताव पाठविले होते. या सर्व प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. सन २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्यानुसार रमाई आवास योजनेच्या माध्यमातून प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे.

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे एका खंडानंतर घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. मात्र उदिष्ट मोठ्या प्रमाणावर मिळाल्याने रमाई आवास योजनेचे एकुण उदिष्ट कमी होत आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील उदिष्टात समाविष्ट करुन घरकुलांचा लाभ दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com