साईनाथ महाराजांच्या उपस्थितीत तीन दिवस स्वच्छता

साईनाथ महाराजांच्या उपस्थितीत तीन दिवस स्वच्छता
Published on: 
ABD26J80916 ----- छत्रपती संभाजीनगर : स्वच्छता अभियानात सहभागी साईनाथ महाराज वसमतकर यांच्यासह नागरिक. ------------- साईनाथ महाराजांच्या उपस्थितीत शहरात तीन दिवस स्वच्छता ----- छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान शहरात सलग तीन दिवस विशेष स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले. शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या विशेष सहभागामुळे या अभियानाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. क्रांती चौक, पद्मपुरा बौद्ध स्मशानभूमी, सातारा परिसर, खंडोबा मंदिर, घाटी रुग्णालय आणि सिद्धार्थ उद्यान परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रसंतांसोबत सुमारे २५० भाविक, मनपा अधिकारी-कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सृष्टी वेस्ट मॅनेजमेंटची आईसी टीम यामध्ये सहभागी झाली होती. पपेट शो, ‘स्वच्छतेचा पीके’ आणि मोटू-पतलूच्या माध्यमातून नागरिकांना ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि सिंगल युज प्लॅस्टिक टाळण्याचे महत्त्व मनोरंजक पद्धतीने पटवून देण्यात आले. शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर राष्ट्रसंत साईनाथ महाराजांनी मनपाच्या कार्याचे कौतुक केले व छत्रपती संभाजीनगर एक नंबर हा नारा सार्थ असल्याचे नमूद केले. स्वच्छता ही फक्त रस्त्यांची नसून विचारांचीही हवी, ज्याची सुरवात मनापासून झाली पाहिजे, असा संदेश यावेळी महाराजांनी दिला. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे अब्दुल साजिद, क्षेत्र व्यवस्थापक शहजाद धांडे, दिलशाद खान सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com