

छत्रपती संभाजीनगर : चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) संसर्गजन्य आजार पसरला. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा एक सामान्य विषाणू आहे. त्यामुळे धोका नाही. परंतु, काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे.