फूड फास्ट… पोट स्लो!
आपण खातोय वेगाने, पण पचनसंस्थेला विचारतोय का?
आजच्या पिढीचे आयुष्य ‘फास्ट’ झाले आहे. Fast Internet, Fast Delivery, Fast Travel, Fast Payment... आणि अर्थातच Fast Food! पण या सगळ्या वेगात एक गोष्ट मात्र दिवसेंदिवस ‘‘Slow’’ होत चालली आहे, आपले पोट!
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण पोटाला नेमके काय देतो, याचा एक दिवस तरी हिशेब करून पाहा.
दिवसाची सुरुवात अनेकांची चहा-कॉफी आणि साखरेने होते. सोबत बिस्किट, टोस्ट, खारी. नाश्त्याला वडा-पाव, समोसा, कचोरी, मिसळ, पोहे, सँडविच किंवा इडली-दोसा बाहेरचा. दुपारी ऑफिसमध्ये कॅन्टीन, ऑनलाइन ऑर्डर किंवा हॉटेलचे जेवण. दुपारनंतर पुन्हा चहा-बिस्किट. संध्याकाळ झाली की पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, चायनीज, मोमोज, पिझ्झा, बर्गर... आणि रात्री मित्र किंवा कुटुंबासोबत हॉटेलमध्ये स्टार्टर, मसालेदार जेवण, नॉनव्हेज, डेझर्ट; काहींच्या बाबतीत मद्यही.
मध्येच कोल्ड ड्रिंक, पॅकेज्ड ज्यूस, चिप्स, नमकीन, चॉकलेट आणि ‘थोडंसंच खाल्लं’ म्हणून मोजणीबाहेर गेलेले अनेक पदार्थ!
मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपली एकच अपेक्षा-
‘डॉक्टर, सकाळी पोट एकदम साफ झालं पाहिजे!’
पोट म्हणत असेल, ‘मालक, आधी काल काय-काय टाकलं त्याचा हिशेब तरी द्या!’
आज पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत गर्दी आहे. बाहेर खाणे आता एखाद्या खास प्रसंगापुरते राहिलेले नाही; अनेक कुटुंबांच्या दिनचर्येचा भाग झाले आहे. घरचे साधे वरण-भात, पोळी-भाजी, भाकरी, उसळ, कोशिंबीर यापेक्षा बाहेरच्या चवीची सवय जिभेला जास्त लागली आहे. घरात स्वयंपाक सध्या होत नाही, की गृहिणीलासुद्धा घराची चव बेचव लागत आहे. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिभेला रोज नवीन चव हवी असते; आतड्यांना मात्र रोज शिस्त हवी असते.
पोट म्हणजे मुंबईची लोकल नाही!
आपली पचनसंस्था मला अनेकदा मुंबईच्या लोकलसारखी वाटते. कितीही फुल्ल भरली तरी ‘लोकलने वेळेवर, सुरळीत आणि आरामात पोहोचायलाच पाहिजे!’
आपण पोटासोबतही हेच करतो. भूक आहे की नाही याचा विचार नाही. वेळ कोणती आहे याचा विचार नाही. काल काय खाल्ले याचा विचार नाही. किती खाल्ले याचे भान नाही. समोर दिसले, आवडले, ऑफर होती, मित्रांनी आग्रह केला,की खा!
पोट भरले तरी dessert साठी जागा असते. त्यानंतर ice cream. घरी पोहोचल्यावर पुन्हा काहीतरी.
पण, दुसऱ्या दिवशी पचनसंस्थेने मात्र ‘Great Performance’ दिली पाहिजे! जेवण कधीही कितीही कुठेही केव्हाही खाऊन ‘Perfect Digestion’ची अपेक्षा करणे ही आपल्या पिढीची मोठी चूक आहे.
--
शरीराला फसविता येत नाही
आपण एखाद्या व्यक्तीला फसवू शकतो, स्वतःची समजूत काढू शकतो; पण आपल्या शरीराला रोज फसविता येत नाही.
constipation, acidity, करपट ढेकर, गॅसेस याला कारणीभूत जीवनशैली.
शरीर मात्र प्रत्येक दिवसाची नोंद ठेवत असते.
यासाठी मला बँकेचे उदाहरण फार योग्य वाटते.
समजा तुम्ही रोज १०० ची RD किंवा नियमित गुंतवणूक करता. दहा-वीस वर्षांनी मुद्दल आणि व्याज कोणाला मिळते? तुम्हालाच!
आरोग्याचीही एक अदृश्य Health Bank आहे.
आज योग्य आहार, वेळेवर जेवण, पुरेसे पाणी, व्यायाम, चांगली झोप, फळे-भाज्या आणि योग्य शौचाची सवय जमा केली, तर त्याचे ‘व्याज’ पुढील आयुष्यात चांगल्या आरोग्याच्या रूपात मिळते.
पण रोज Fast Food, जास्त साखर, तेलकट पदार्थ, मद्य, कमी पाणी, कमी झोप, सतत बसून काम, ताण आणि अनियमित जेवण जमा केले, तर त्यावरही व्याज मिळते, फक्त ते आपल्याला नको असलेल्या स्वरूपात!
वजन वाढणे, ॲसिडिटी, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि इतर जीवनशैलीशी संबंधित समस्या कालांतराने समोर येऊ शकतात.
Health Bank मध्ये तुम्ही जे Deposit करता, त्याचाच Return तुम्हाला मिळतो.
‘रोज शौच होते’ म्हणजे पोट व्यवस्थितच असे नाही. माझ्याकडे अनेक रुग्ण म्हणतात, ‘डॉक्टर, मला constipation नाही. मला रोज शौच होते.’
पण रोज शौच होणे एवढीच व्याख्या नाही. मल खूप कडक असणे, जोर लावावा लागणे, पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटणे, वारंवार शौचाला जावे लागणे किंवा शौचालयात बराच वेळ बसावे लागणे, ही बद्धकोष्ठतेशी संबंधित लक्षणे असू शकतात आणि याच ठिकाणी पुढे फिशर, मूळव्याध यांसारख्या गुदरोगांचा त्रास सुरू होऊ शकतो. म्हणून पोटाचा प्रश्न ‘आज शौच झाले का?’ एवढाच नाही. शौच सहज, नियमित आणि अनावश्यक जोर न लावता होते का? हा खरा प्रश्न आहे.
पोट साफ करण्यापेक्षा पोट बिघडू न देणे महत्त्वाचे
बद्धकोष्ठतेच्या रुग्णांमध्ये आम्ही गरजेनुसार Anulax तसेच तीव्र किंवा दीर्घकालीन बद्धकोष्ठतेसाठी Mirraclz Kit of ५ सारख्या औषधांचा उपयोग करतो. पाच औषधांचा नियोजित कोर्स रुग्णाच्या लक्षणांनुसार दिला जाऊ शकतो.
पण, येथे एक गोष्ट स्पष्ट आहे, एक-दोन महिने औषध घेतले म्हणजे पुढची दहा वर्षे पचनसंस्था ‘क्लीन’ राहील, असे वैद्यकीयदृष्ट्या म्हणता येत नाही. औषधाने मदत मिळू शकते; पुढची अनेक वर्षे पोट चांगले ठेवण्याचे काम मात्र तुमच्या रोजच्या सवयी करतात. म्हणूनच औषधाबरोबर आहार, पाणी, व्यायाम, झोप आणि शौचाच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. सतत किंवा नव्याने सुरू झालेली बद्धकोष्ठता, रक्तस्राव यासाठी औषधे घेत राहण्याऐवजी तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
२०२६ चा Health Mantra
आपल्याला Fast Life थांबविता येणार नाही. बाहेर खाणे पूर्ण बंद करणेही प्रत्येकाला शक्य नाही. प्रश्न बाहेर खाण्याचा नाही, प्रश्न प्रमाण, वारंवारता आणि शिस्तीचा आहे. आठवड्यातील बहुतेक जेवण साधे घरचे ठेवा. भूक नसताना खाऊ नका. पुरेसे पाणी प्या. रोज काहीतरी हालचाल करा. आहारात नैसर्गिक fibre वाढवा. रात्री उशिराचे जड जेवण कमी करा आणि सर्वांत महत्त्वाचे, आपल्या पोटाच्या तक्रारींकडे ‘चालतंय’ म्हणून दुर्लक्ष करू नका.
कारण, ‘फूड फास्ट असलं तरी चालेल... पण पोट स्लो होऊ देऊ नका!’
आजची चव काही मिनिटांची असते; पचनसंस्थेचे आरोग्य मात्र आयुष्यभराचे असते.
डॉ. शिवकुमार गोरे
मूळव्याध, भगंदर व बद्धकोष्ठतातज्ज्ञ
सुश्रुत हॉस्पिटल
संपर्क : ९६७३५०७३५५.