

The Hirkani room at Gangapur bus stand remains locked, raising concerns over access for breastfeeding mothers and women passengers.
esakal
गंगापूर, : प्रवासादरम्यान महिला व स्तनदा मातांची गैरसोय आणि कुचंबणा थांबावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून गंगापूर शहरात उभारण्यात आलेले सुसज्ज ''हिरकणी कक्ष'' सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. महिला प्रवाशांची अहोरात्र वर्दळ असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि न्यायालय परिसरातील हिरकणी कक्षांना कायमचे कुलूप ठोकलेले असल्याने या महत्त्वपूर्ण शासकीय सुविधेचा फज्जा उडाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.