हेल्मेटमुळे डोक्याची गंभीर दुखापत टळली

हेल्मेटमुळे डोक्याची  गंभीर दुखापत टळली
Published on: 
हेल्मेटमुळे डोक्याची गंभीर दुखापत टळली ----------- लातूर, ता. २४ ः दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणे किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय हाडोळती-शिरूर महामार्गावर घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आला आहे. शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी सुमारे ६ च्या सुमारास रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ऋषीकेश पांढरी नागणे (वय ५९, रा. मेथी, ता. अहमदपूर) यांच्या पायाला दुखापत झाली. मात्र, त्यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे डोक्याला होणारी संभाव्य गंभीर दुखापत टळली. ऋषीकेश नागणे हे आपल्या पत्नीसह पाहुण्याच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून ते दुचाकीवरून आपल्या मेथी या गावी परत जात असताना हाडोळती- शिरूर महामार्गावर अचानक कुत्रा रस्त्यावर आडवा आला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेत नागणे यांच्या पायाला मार लागला; मात्र हेल्मेटमुळे त्यांच्या डोक्याचे संरक्षण झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रायबोळे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. जखमी नागणे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. रस्ते अपघात अनपेक्षितपणे घडतात. अशा वेळी हेल्मेटमुळे डोक्याला होणारी गंभीर दुखापत आणि जीवितहानीचा धोका कमी होण्यास मदत होते. नागणे यांच्यासोबत घडलेली घटना प्रत्येक दुचाकीस्वारासाठी महत्त्वाचा संदेश देणारी असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com