South Central Railway announces a 16-day block for doubling work on the Nagarsool-Tarur railway section.
esakal
छत्रपती संभाजीनगर, : नगरसूल-तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला असून, या कामांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, असा १६ दिवसांचा ब्लॉक घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे १६ दिवसांत चार गाड्यांच्या २० फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर १२ गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय तीन गाड्या विलंबाने धावणार आहेत.