देवीच्या आराधनेला रविवारपासून मंगलमय प्रारंभ

देवीच्या आराधनेला रविवारपासून मंगलमय प्रारंभ
Published on: 
अँकर --- देवीच्या आराधनेला रविवारपासून मंगलमय प्रारंभ ---- घटस्थापनेचा सकाळी ११ ते दुपारी १२.३० चा शुभमुहूर्त; गावागावांत उत्साह ------ केदारखेडा, ता. ८ (बातमीदार) : शारदीय देवी नवरात्रोत्सवाला रविवार (ता. ११) पासून प्रारंभ होत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यासाठी सकाळी ६.३० ते ११ पर्यंत शुभ मुहूर्त असून, सकाळी ११ ते दुपारी १२.३० पर्यंतचा कालावधी सर्वोत्तम मुहूर्त असल्याची माहिती पुरोहित सुधाकर जोशी यांनी दिली. घटस्थापनेवेळी शुभ ग्रहांचा अनुकूल प्रभाव राहणार असल्याने या कालावधीत विधिवत घटस्थापना करणे योग्य ठरणार असल्याचे पुरोहित जोशी यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवीची पूजा, अखंड दीपप्रज्वलन, दुर्गासप्तशती पाठ, नवचंडी होमहवन तसेच अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कुमारिका पूजन करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे यंदाही भाविकांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पुरोहित सुधाकर जोशी यांच्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक विधी व पूजा-अर्चा केल्या जातात. काही कुटुंबांमध्ये नवदुर्गा पूजाविधी करण्याची परंपरा आहे. नवरात्र उद्यापनानंतर महानवमी व विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त दुपारी २.०२ ते २.४८ पर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. या मुहूर्तावर शस्त्रपूजन, वाहनपूजन तसेच विविध शुभ कार्ये करण्याची परंपरा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांनी आपल्या कुलाचार व कुटुंबाच्या परंपरेनुसार देवीची आराधना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. काही कुटुंबांमध्ये नवरात्र बसविल्यानंतर इतर देवींची पूजा केली जात नाही, तर काही ठिकाणी घटस्थापना केलेल्या ठिकाणी दररोज देवीची पूजा-अर्चना केली जाते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावागावांतील देवी मंदिरांमध्ये स्वच्छता, विद्युत रोषणाई आणि सजावटीची कामे सुरू झाली आहेत. मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली असून नवरात्रोत्सवासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. ---- देवीच्या पूजेसाठी दररोज वेगळा रंग नवरात्रोत्सवात देवीला दररोज वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे व फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यानुसार नऊ दिवसांसाठी रंगांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे. नवरात्रातील देवीचे नऊ रंग ः तारीख वार देवीचा रंंग ११ ऑक्टोबर रविवार नारंगी १२ ऑक्टोबर सोमवार पांढरा १३ ऑक्टोबर मंगळवार लाल १४ ऑक्टोबर बुधवार रॉयल ब्ल्यू १५ ऑक्टोबर गुरुवार पिवळा १६ ऑक्टोबर शुक्रवार हिरवा १७ ऑक्टोबर शनिवार राखाडी १८ ऑक्टोबर रविवार जांभळा १९ ऑक्टोबर सोमवार मोरपंखी -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com