ओपन स्पेस विकासाच्या प्रतीक्षेत

ओपन स्पेस विकासाच्या प्रतीक्षेत
Published on: 
फोटो क्रमांक- OSM26B07269 ----------- खुल्या जागा बनताहेत कचरा डेपो स्वःमालकीच्या जागांकडेही पालिकेचे दुर्लक्ष, अतिक्रमणांनाही निमंत्रण धाराशिव, ता. २४ (बातमीदार) ः शहरातील विविध ठिकाणच्या रहिवासी भागांमध्ये पालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागा (ओपन स्पेस) सध्या पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करताना नियमानुसार ठराविक जागा खुल्या वापरासाठी आरक्षित ठेवावी लागते. मात्र, पालिकेच्या अनास्थेमुळे सध्या यापैकी बहुतांश ठिकाणच्या जागांचा वापर नागरिक केवळ कचरा टाकण्यासाठीच करत असल्याचे चित्र आहे. याशिवाय पालिकेच्या मालकीच्या अनेक जागाही दुर्लक्षित असल्याने याठिकाणी नाहक अतिक्रमणांना निमंत्रण दिले जात असल्याचे चित्र आहे. खुल्या जागांचा वापर योग्य पद्धतीने केला तर शहराच्या सौंदर्यात भर पडते. काही वर्षांपूर्वी पालिकेने शहरात पुढाकार घेऊन, अशा काही खुल्या जागांवर लहान उद्याने विकसित केले होते. सुरवातीच्या काळात या उद्यानांचा स्थानिक नागरिकांना मोठा फायदा झाला. परंतु, पुढे नियमित देखभालीअभावी त्याठिकाणी दुरवस्था झाली आणि हळूहळू या जागा पुन्हा ओसाड झाल्या. सध्या या बहुतांश खुल्या जागांवर परिसरातील कचरा, प्लॅस्टिक आणि टाकाऊ वस्तू टाकल्या जात आहेत. पालिकेकडून या भागांची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे तेथे सध्या घाणीचे साम्राज्य असलेले दिसून येते. पालिकेने असे ओपन स्पेस स्वच्छ करून या जागांचा वापर विविध उपक्रमांसाठी केल्यास त्याचा निश्चित फायदा होई शकतो तसेच कचऱ्याच्या समस्येतून नागरिकांची मुक्तता होऊ शकते. ---------- आबालवृद्धांना हवी उद्याने लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून फिरण्यासाठी किंवा तिथे बसण्यासाठी एकही साधी जागा शहरात नाही. शहरात यापूर्वी असलेल्या प्रमुख उद्यानांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. ही उद्याने विकसित करण्याची आश्‍वासने पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत विविध पक्षांकडून दिली जातात. मात्र त्यानंतर ते विकसित करण्यासाठी नेत्यांकडून कोणतेही ठोस पाऊले उचलली जात नसल्याची स्थिती आहे. ------- सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला कचरा हा घंटागाड्यांतच टाकावा. कुठल्याही खुल्या जागांवर कचरा टाकू नये. येत्या काळात या जागांचा वापर सुनियोजित पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी शासन व नागरिकांच्या सहभागाने आराखडा तयार करू. - नीता अंधारे, सीओ, धाराशिव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com