पाच हजारांची लाच लाच घेताना पीएसआय, अंमलदार जाळ्यात

पाच हजारांची लाच लाच घेताना 
पीएसआय, अंमलदार जाळ्यात
Published on
लेटनाइट ----- पाच हजारांची लाच घेताना पीएसआय, अंमलदार जाळ्यात मुकुंदवाडी ठाण्यातील घटना, दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी मागितले १५ हजार छत्रपती संभाजीनगर : खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून त्यातील पाच हजार रुपये स्वीकारताना मुकुंदवाडी ठाण्यातील पोलिस अंमलदार सुभाष छगन राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. आठ) सायंकाळी रंगेहाथ पकडले. यात पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तक्रारदार महिलेचा मुलगा खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सध्या कारागृहात आहे. या प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची मागणी केली होती. महिलेला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, तपास अंमलदार राठोडने तडजोडीनंतर पाच हजार रुपये आधी आणि उर्वरित पाच हजार रुपये नंतर घेण्याचे ठरवले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी मुकुंदवाडी ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच अंमलदार राठोड याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शिनकर, साईनाथ तोडकर आणि पथकाने केली. दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री एकपासून त्यांच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com