The Zeen Travels bus that crashed into a drain after breaking the bridge railing near Samadhan Hotel on the Chhatrapati Sambhajinagar-Jalna Highway.
esakal
बाळासाहेब काळे
करमाड :पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाचा कठडा तोडून सुमारे दहा फूट खोल नालीत कोसळली. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील समाधान हॉटेलसमोर शनिवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत साई संजय दिघे (वय २०, रा. कालिकानगर, पिंपळवाडी, ता. शिर्डी, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.