पात्र शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवा; नवीन पीककर्ज द्या

पात्र शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवा; नवीन पीककर्ज द्या
Published on: 
पात्र शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवा; नवीन पीककर्ज द्या -डॉ. सुभाष कदम यांची मागणी सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.२३ ः महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची मुद्दल व व्याजाची वसुली थांबवून त्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. सुभाष कदम यांनी गंगाखेड येथील कॅनरा बँकेच्या शाखा व्यवस्थापनाकडे केली. यासंदर्भात सात दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन बँकेच्या कर्ज अधिकाऱ्यांनी दिले. गंगाखेड येथील कॅनरा बँक शाखेतर्फे कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली केली जात असल्याची तक्रार चिंचटाकळी, कोळवाडी येथील शेतकऱ्यांनी डॉ. कदम यांच्याकडे केली होती. त्यानंतर सोमवारी (ता.१९) डॉ. कदम यांनी चिंचटाकळी, कोळवाडी, शेंडगा, खोरस येथील शेतकऱ्यांसह बँकेच्या शाखेला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पात्र शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली तातडीने थांबवावी, त्यांना नवीन पीककर्ज द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास बँकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. कदम यांनी दिला. मात्र, शाखा व्यवस्थापक उपस्थित नसल्याने कर्ज अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर सात दिवसांत पात्र शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली न करता पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. परभणी जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची वसुली करू नये, असे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. वसुली सुरू राहिल्यास संबंधित बँक व्यवस्थापना विरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी, त्यानंतर नवीन पीककर्ज उपलब्ध होईपर्यंत भाजपची टीम प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com