शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
Published on: 
शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात जालना, ता.५ : १०० शिक्षक समूह जालनातर्फे महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी (ता. दोन) शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर येथे पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भास्कर अंबेकर, उपशिक्षणाधिकारी रवी जोशी उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व महात्मा फुले यांचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. बक्षिसांसाठी डॉ. प्रदीप हुशे, गिरीश पुजारी, डॉ. प्रमोद कुमावत, सुभाष भालेराव, अनुजा राऊत, ज्ञानेश्वर पवार, मोहन अंभोरे, राजेश शेवाळे, संदीप इंगोले व विजय निकाळजे यांनी सहकार्य केले. प्रमाणपत्र व सन्मानचिन्हासाठी क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण घनवट यांनी सहकार्य केले. दरम्यान, स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब खंडाळे, डॉ. चंद्रकांत धोत्रे, नारायण राजेभोसले, भारत साळवे, विलास जमधडे, रामेश्वर धोपटे तसेच उर्दू विभागासाठी नजमोद्दीन व तालिब कुरेशी यांनी तज्ज्ञ परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. यशवंत सोनुने, संजय देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन साजिद खान पठाण यांनी केले. अशोक माधवले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेभाऊ मगर, साजिद पठाण, अशोक माधवले, विलास जमधडे, विजय निकाळजे, रामेश्वर धोपटे, अमोल कंडारे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com