उमरी-मांडाखळीत थायलंडच्या भिक्खू संघाच्या सानिध्यात भव्य धम्म सोहळा

उमरी-मांडाखळीत थायलंडच्या भिक्खू संघाच्या सानिध्यात भव्य धम्म सोहळा
Published on: 
उमरी-मांडाखळीत घुमणार धम्माचा वैश्विक संदेश ------------- थायलंडच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत रविवारी सोहळा सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.६ ः बौद्ध धम्म परंपरेत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावास पर्वानिमित्त उमरी-मांडाखळी येथे बौद्ध धम्माच्या वैश्विक विचारांचा जागर होणार आहे. नियोजित बुद्ध विहाराच्या दहा एकर जागेत रविवारी (ता.१८) सकाळी १० ला भव्य धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात थायलंडच्या भिक्खू संघासह देश-विदेशातील विद्वान भिक्खूंची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली. आश्रय सेवाभावी संस्था, गगन मलिक फाउंडेशनतर्फे या धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षावासाच्या काळात भिक्खू संघ एका ठिकाणी वास्तव्यास राहून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा सखोल अभ्यास, चिंतन, साधना करतो. या परंपरेतून करुणा, मैत्री, प्रज्ञा, समता, मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोचविला जातो. याच धम्मपरंपरेला पुढे नेत उमरी-मांडाखळी येथे या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास थायलंड येथील भदंत साँगसाक कोविडा, भदंत थेरायुत चट्टामालो, भदंत चायुटपांग,भदंत नरेश नरेंदो यांची उपस्थिती राहणार आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत इंद्रियसमवरा, भदंत अभिवन्नो, भदंत शरणानंद महास्थवीर, भदंत पय्याबोधी, भदंत पय्यानंद थेरो, भदंत धम्मबोधी, भदंत मोगलायन यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते तथा गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष धम्म उपासक डॉ. गगन मलिक, थायलंडच्या प्रसिद्ध उद्योगपती मैथाई, त्रिरत्न भूमी सोसायटी, थायलंडचे संस्थापक कॅप्टन डॉ. नट्टकटी उपस्थित राहणार आहेत. या वेळी थायलंड येथील भिक्खू संघाच्या वतीने पवित्र परित्राण पाठाचे पठण करण्यात येणार असून त्यानंतर धम्मदेसना होणार आहे. कठीण चिवरदान आणि बुद्धमूर्ती वाटप हे धार्मिक व सामाजिक उपक्रमही पार पडणार आहेत. जगभरातील बौद्ध समाजाला प्रेरणा देणाऱ्या धम्मगुरूंच्या उपस्थितीत भगवान बुद्धांचा करुणा, मैत्री, समता, मानवतेचा वैश्विक संदेश ऐकण्याची संधी या सोहळ्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. परभणी जिल्ह्यासह परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com