मानवत तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी त्रिस्तरीय समिती

मानवत तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी त्रिस्तरीय समिती
Published on: 
पाणीटंचाई निवारणासाठी त्रिस्तरीय समिती ------------- मानवतमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठण मानवत, ता. ७ (बातमीदार): दरवर्षी अपुऱ्या पर्जन्यमानामुळे किंवा अन्य कारणांमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी शासनाने त्रिस्तरीय समित्यांची रचना केली आहे. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, विविध शासकीय यंत्रणांत समन्वय, नियमित आढावा घेण्यासाठी महसूल विभागस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ६ ऑक्टोबर रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सद्यस्थितीत ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन टंचाई उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील तालुकास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार पांडुरंग माचेवाड असतील. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी सदस्य म्हणून सहभागी होतील. याशिवाय गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता, जलसंपदा विभागाचे उपअभियंता, मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता, भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक, तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवक, आवश्यकतेनुसार इतर शासकीय अधिकारी समितीत असतील. ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद येथील उपअभियंता हे सदस्य सचिव असतील.या त्रिस्तरीय यंत्रणेमुळे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनांचे नियोजन, अंमलबजावणी, त्यावर नियमित देखरेख ठेवण्यास मदत होणार आहे ((चौकट)))) दर पंधरवड्याला होणार बैठक तालुकास्तरीय समितीची बैठक प्रत्येक पंधरवड्यात एकदा घेण्यात येणार आहे. मानवत तालुक्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेकडे सादर झाला आहे का, याचा आढावा समिती घेणार आहे. प्रत्येक टंचाईग्रस्त गाव व वाडीनिहाय आणि महिन्यानिहाय कोणत्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, याची सविस्तर माहिती कृती आराखड्यात समाविष्ट आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. ----------- ((चौकट))) उपाययोजनांची तयारी पूर्ण कृती आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजना राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे का, याचाही आढावा घेतला जाणार आहे. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचण निर्माण झाल्यास जिल्हास्तरीय समितीकडे पाठपुरावा करून संबंधित कामे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ---- ((चौकट))) जिल्हा समितीकडूनही नियंत्रण जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्ताचा आढावा घेणार असून, टंचाईग्रस्त गाव-वाड्यांत कृती आराखड्यानुसार उपाययोजना होत आहेत का, उपलब्ध निधीचा योग्य विनियोग होत आहे का आणि संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणी मिळत आहे का, याची खात्री करणार आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com