

MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
esakal
-अविनाश काळे
उमरगा : "गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील प्रवासात मी नेहमीच सकारात्मक विचारांची शिदोरी जपली आहे. याच प्रामाणिक कामाच्या जोरावर जनतेने मला नेहमीच भक्कम कौल दिला," अशा भावना विधानपरिषदेचे नवनियुक्त आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आपल्याला विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली असून, आगामी काळात सर्व जाती-धर्मांतील लोकांच्या कल्याणासाठी अविरतपणे काम करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.