Hingoli News: हिंगोली पोलिस दलाची ऐतिहासिक कामगिरी;‘सीसीटीएनएस’ प्रणालीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक

Hingoli Police Achievemen: हिंगोली पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणालीत फेब्रुवारी २०२६ मध्ये २०१ पैकी २०१ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. डिजिटल पोलिसिंग व तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे गुन्हेगारी नियंत्रण व कारवाईत गती वाढवली गेली.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: राज्यातील ५३ पोलिस घटकांच्या क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम’ (सीसीटीएनएस) कामगिरीचा नुकताच आढावा घेण्यात आला. यामध्ये हिंगोली पोलीस दलाने फेब्रुवारी-२०२६ या महिन्यात २०१ पैकी २०१ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १०० टक्के कामगिरीसह हिंगोली जिल्ह्याने तांत्रिक क्षेत्रात आपली मोहर उमटवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com