

Eight Year Old Child Suffers Life Changing Injury In Chaff Cutter Accident As Parents Rush Severed Hand To Hospital
esakal
कायगाव: शाळा सुटली, दप्तर घरी टाकले आणि मित्रांसोबत खेळायला गेलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याच्या आयुष्याला काळाने घाला घातल्याने कायमचे अपंगत्व दिले. बंद पडलेल्या चारा कुट्टी मशीनवर निरागसपणे हात ठेवून बसलेल्या उमेशचा उजवा हात क्षणार्धात लाईट आल्याने मशील अचानक चालू झाल्यामुळे मशीनमध्ये अडकून मनगटापासून तुटला. कायगाव-गणेशवाडी हद्दीत बुधवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसर हळहळला आहे.