Farmer Agitation : धुळे-सोलापूर महामार्गावर पुन्हा शेतकऱ्यांचा ‘एल्गार’; खुद्द आयजी वीरेंद्र मिश्राच तासभर ट्रॅफिकमध्ये अडकले

​पाडळसिंगी टोलनाका सलग दुसऱ्या दिवशी जाम; कोल्हापूरच्या धर्तीवर ४२०० रुपये भाव आणि एक लाखाच्या मदतीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर, महामार्गावर वाहनांच्या मैलोन्‌मैल रांगा
farmer agitation on dhule solapur highway

farmer agitation on dhule solapur highway

sakal

Updated on: 

बीड - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी अखेर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही धगधगताना पाहायला मिळाला. गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी टोलनाक्यावर रविराज साबळे आणि विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा महामार्ग रोखून धरला.

Loading content, please wait...