टाकळी राजेराय - एकेकाळी निजाम राजवटीत तालुक्याचे ठिकाण असलेले खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथिल ऐतिहासिक वारसे देखभाल दूरुस्ती अभावी शेवटचे घटीका मोजत आहे..निजामांच्या काळात टाकळी हे गाव जहागीरीचे होते. या ठिकाणी राजे शामराज बहाद्दर यांना ही जहागिर बहाल करण्यात आली होती. त्यांनी येथे कोर्ट, मुन्सफ, पोलीस ठाणे राहण्यासाठी सुसज्ज हवेली बांधली होती. परंतु देखभाल दुरुस्ती अभावी यातील अनेक वास्तु नामशेष झाल्या आहेत.राजे शामराज बहाद्दर यांनी निर्माण केलेल्या पोलीस ठाणे, कचेरी, पोस्ट आॅफीस, राहण्यासाठी सुसज्ज असे घर घोडे व हत्ती साठी तबेले देखरेखीअभावी पुर्णता नष्ट झाले आहेत. तर उर्वरीत असलेली भव्य प्रवेश व्दाॅर, जिल्हा परिषदेची भरत असलेल्या शाळेची इमारत, देवीचे मंदीर आता शेवटची घटका मोजत आहे. काही महिन्यापुर्विच एका प्रवेशव्दाॅरावरुन ग्रामपंचायती कारभार नविन इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे..प्रवेशद्वाराचा मुतारीसाठी वापर, भिंतीवर झाडे झुडपीबाजार भरत असलेल्या प्रवेशद्वाराचा वापर संध्या मुतारीसाठी होत असुन प्रवेशव्दारावर झाडेही उगवून आली आहेत. त्यामुळे या वास्तुचे भवितव्यही आता ऊतरत्या कळेला लागले आहे. या वर लवकरच उपाय योजना न केल्यास भविष्यात ह्या सर्व गोष्टी कथेतुनच नविन पिढीला सांगण्याची वेळ येणार आहे..ग्रामस्थ म्हणतात१) इक्रम पटेल ( जेष्ठ नागरिक) -निजाम राजटीच्या काळात तालक्याच्या ठिकाणाचे अस्तित्व दाखवणारे वारसे देखरेखीअभावी लुप्त होत आहे. शिल्लक राहिलेल्या वास्तुचे वेळिच सर्वर्धन न केल्यास हेही लवकरच इतिहास जमा होतील.२) श्यामदास वैष्णव (तरूण) -ऐतिहासिक गाव असताना देखिल इतिहासाच्या खुना दाखवणारे वारसे अलिप्त होत असुन काही ठराविक खुनाच आम्हाला पाहण्यास मिळाल्या. आता त्याही नामशेष होत असल्याचे दिसत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.